Butter Chicken Recipe in Marathi ही भारतीय खाद्य प्रेमींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.या रेसिपीला “मुर्ग मखनी”( murgh makhani )असे देखील म्हणतात. हा पदार्थ खरं तर मुळचा दिल्लीचा आहे पण आज भारताच्या प्रत्येक राज्यात हा पदार्थ प्रसिद्ध झाला आहे.
बटर चिकनचा शोध १९५० साली दिल्लीतल्या कुंदनलाल गुजराल यांनी लावला होता.पूर्वीच्या काळात बऱ्याचदा उरलेले तंदुरी चिकनचे तुकडे फेकून देण्यात येत असे.याच उरलेल्या तुकड्यांना फेकून देण्याऐवजी यातूनच नवीन रेसिपी तयार करयाची त्यांना कल्पना सुचली.
त्या चिकन च्या तुकड्यांना क्रीम ,लोणी, tomato ,सुगंधी मसाले वापरून tomato च्या gravy मध्ये शिजवले जाई.अशा रीतीने या रेसिपीचा शोध लागला.यामुळे अन्नाची नासाडी तर थांबलीच पण एका चवदार पदार्थाचा शोध लागला आणि तिथून पुढच्या काळात ही रेसिपी हळूहळू संपूर्ण भारतभर पसरली.
बटर चिकन बनवताना त्यात मध्ये प्रामुख्याने बटर,tomato मलई, आणि सुगंधी मसाले यांचा वापर जास्त केला जातो, त्यामुळेच चिकन चवदार आणि स्वादिष्ट बनते.या रेसिपीचे नाव ऐकूनच बऱ्याच तोंडाला पाणी सुटले असेल.जेव्हा तुम्ही हा पदार्थ स्वतः घरी बनवाल तेव्हा हॉटेल पेक्षाही जास्त चवदार होईल अशी माझी खात्री आहे.
Butter Chicken Recipe in Marathi बनवण्यासाठी पटकन साहित्य जमा करा आणि कृती करा !
तयारीची वेळ | 15 मिनिटे |
स्वयंपाकाची वेळ | 40 मिनिटे |
सर्व्हिंग | ५ लोकांसाठी |
साहित्य ( butter chicken ingredients )
- चिकन marinate करण्यासाठी
- 1 kg चिकन (chicken)
- मीठ चवीनुसार (salt )
- लाल मिरची पावडर चवीनुसार
- गरम मसाला १ चमचा किंवा चवीनुसार
- बटर (butter)
- हळद १/८ टीस्पून
- बारीक चिरलेली कोथिंबीर (coriander)
- कसुरी मेथी १ टीस्पून
- तेल १ टेबलस्पून
- जिरे पावडर १/२ टीस्पून
- धना पावडर १ टीस्पून
- दही १/३ कप
- आले लसणाची पेस्ट ३/४ टेबल स्पून
ग्रेवी साहित्य (chicken gravy ingredients)
- दालचिनी १ तुकडा
- २ चमचे बटर
- 2 चमचे अद्रक लसून पेस्ट
- हिरव्या वेलची ४
- 2 चमचे tomato सॉस
- लवंगा ४
- गरम मसाला १ टीस्पून
- जिरे पावडर अर्धा टीस्पून
- धना पावडर १ टीस्पून
- ठेचलेली कसुरी मेथी
- बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या चवीनुसार
- लाल मिरची पावडर चवीनुसार
- मीठ चवीनुसार.
कृती ( how to make Butter Chicken )
- सर्वात पहिले चिकनचे तुकडे स्वच्छ पाण्याने धुवून एका भांड्यात ठेवून द्या.
- एका भांड्यात आले-लसून पेस्ट,लिंबाचा रस,मिरची,दही,मीठ, टाकून त्याची पेस्ट बनवा.
- चिकनच्या तुकड्यांना ही पेस्ट व्यवस्थितपणे लावून घ्या.
- त्यानंतर चिकन 40 मिनिटे मुरण्यासाठी झाकून ठेवून द्या.
- त्यानंतर मध्यम आचेवर असलेल्या कढईत बटर टाका.
- त्या बटर मध्ये कांदा,अद्रक लसून पेस्ट आणि बाकीचे सर्व मसाले टाका.
- हलकासा लाल रंग येईपर्यंत परतून घ्या.
- आता आपल्याला tomato ची ग्रेवी बनवायची आहे.
- त्यासाठी टमाटो बारीक कापून मिक्सर मध्ये टाका.
- टमाटो मिक्सर मधून बारीक करून घ्या.
- गाळणीने टमाटोचा सगळा रस गाळून घ्या.
- त्यानंतर मध्यम आचेवर तवा गरम करून घ्या.
- बटर लावून चिकनचे तुकडे दोन्ही बाजूने मउ होईपर्यंत भाजून घ्या.
- त्यानंतर हे चिकन टोमाटोच्या ग्रेवी मध्ये टाका आणि चांगले मिक्स करा.
- ग्रेवी मध्ये थोडेसे पाणी घाला.
- १० मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा.
- आणि मंद आचेवर चिकन वाफेवर शिजवून घ्या.
- आता हे बटर चिकन तयार झालेलं आहे.
- यावर थोडीशी मलई,कोथिंबीर आणि केशर टाकून प्लेट मध्ये सर्व्ह करा.
बटर चिकन बनवताना काही अडचण आल्यास खालील व्हीडीओ बघा !
महत्वाच्या टिप्स ( Important Tips For Buter Chicken Recipe )
- चिकन Marined करायच्या आधी चिकनच्या तुकड्यांना काटा चमच्याने बारीक छिद्रे बनवून घ्या.
- त्यानंतर चिकनवर मसाला लावावा.
- चिकनला छिद्रे केल्यामुळे मसाला आतपर्यंत चांगला मुरतो.
- चिकनला मसाला लावून झाल्यावर जितका जास्त वेळ तुम्ही चिकन मुरण्यासाठी ठेवाल तीतकिच जास्त चव वाढते.
- जेव्हा तुम्ही ही रेसिपी सर्व्ह करता तेव्हा त्यावर मलई आणि केशर ,कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकून सर्व्ह करा.
- यामुळे पदार्थ बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि खाण्याची मजा अजून वाढते.
बटर चिकन खाण्याचे फायदे (Health Benifits Of Butter Chicken Recipe)
बटर चिकन योग्य प्रमाणात खाल्ले तर त्याचे खूप आरोग्यदायी फायदे आहेत.चिकन मध्ये lean प्रोटीनचे प्रमाण उत्तम असते. ज्यामुळे स्नायूं बळकट बनतात आणि त्यांची वाढ चांगली होते.जे लोकं व्यायाम करतात ते या रेसिपी चे सेवन करू शकतात.
Tomato मध्ये लायकोपिन हा Antioxident घटक असतो.ज्यामुळे काही रोगांचा धोका कमी होतो.या व्यतिरिक्त आले,लसून,कसुरी मेथी इत्यादी सारख्या मसाल्यांमुळे पचनसंस्था सुधारते.लोणी आणि मलई मुळे उच्च प्रमाणात कॅलरीज मिळतात.ज्यामुळे वजन वाढण्यासाठी मदत होते.
बटर चिकन जास्त प्रमाणात खाण्याचे नुकसान (butter chicken disadvantage)
- कॅलरी आणि चरबीचे जास्त प्रमाण :बटर चिकन बनवताना त्यात लोणी, मलई आणि काजू पेस्टचा वापर करतात त्यामुळे याची चव तर वाढतेच पण कॅलरी आणि चरबीचे प्रमाण खूप वाढते.त्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते.
- हृदयविकार समस्या : बटर चिकन बनवताना लोणी आणि मलईचा वापर केल्यामुळे त्यात सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण वाढते, त्यामुळे बटर चिकन जास्त प्रमाणात खाल्ल्यावर हृदयविकार आणि इतर आरोग्य समस्यां होऊ शकतात.
- सोडियमचे प्रमाण जास्त: बटर चिकनमध्ये मीठ आणि मसाले असतात,त्यामुळे शरीरात सोडियम जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकते.
- ऍलर्जी: काही लोकांना बटर चिकनमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांची ऍलर्जी होऊ शकते.
बटर चिकन रेसीपीचे प्रकार (different types of butter chicken)
- पारंपारिक बटर चिकन : या पद्धतीत मॅरीनेट केलेल्या चिकनमध्ये क्रीम असलेल्या टोमॅटोच्या सॉसमध्ये लोणी आणि गरम मसाला, जिरे आणि धणे हे मसाले घालून रेसिपी बनवतात.
- हेल्दी बटर चिकन: या पद्धतीत कॅलरी आणि चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी क्रीमऐवजी दही आणि कमी बटर वापरून रेसिपी बनवतात.
- मसालेदार बटर चिकन : या पद्धतीत ज्यांना तिखट आणि मसालेदार खायला आवडते त्यांच्यासाठी मिरची आणि मसाल्यांचे प्रमाण जास्त वापरतात.
- बटर चिकन विथ काजू पेस्ट: काही ठिकाणी रेसिपी मध्ये काजूच्या पेस्टचा वापर करतात ज्यामुळे रेसिपि मलाईदार चव येते.
- तंदूरी बटर चिकन: या पद्धतीत चिकन दही आणि मसाल्यांनी मॅरीनेट करून टोमॅटो सॉसमध्ये शिजवण्याआधी, तंदूर पद्धतीने वाफ देतात.
- स्लो कुकर बटर चिकन: या पद्धतीत चिकन आणि सॉस मंद आचेवर कुकरमध्ये शिजवतात.
- शाकाहारी बटर चिकन: ज्यांना चिकन खायला आवडत नाही त्यांच्यासाठी चिकनऐवजी टोफू, पनीर किंवा भाज्या वापरल्या जातात.
बटर चिकन सर्व्ह करण्यासाठी (serving suggestions)
- वाफवलेला तांदूळ (भात) : तुम्ही बटर चिकन वाफवलेल्या बासमती तांदळाबरोबर सर्व्ह करु शकता.बासमती तांदळाच्या भाताबरोबर बटर चिकन खुप मस्त लागते.
- नान किंवा रोटी : बटर चिकन नान किंवा रोटी सोबत सर्व्ह करू शकता.कुरकुरीत रोटी बटर चिकन सोबत खायला खूप मजा येते.
- रायता: बटर चिकनचा मसालेदारपणा कमी करण्यासाठी दही, काकडी, टोमॅटो आणि मसाल्यांनी बनवलेला रायता सर्व्ह करा.
- पापड
- लोणचे
- कोशिंबीर: जेवणासोबत कोशिंबीर वाढल्यावर जेवणाची मजा अजून वाढते.
रेसिपी बनवण्यासाठी किचनमध्ये लागणारे साहित्य (what are kitchen equipments)
- सॉसपॅन : चिकन आणि सॉस शिजवण्यासाठी याचा वापर करू शकता.
- मिक्सिंग बाऊल्स : चिकन मॅरीनेट करण्यासाठी आणि सॉसचे घटक मिक्स करण्यासाठी याचा वापर करू शकता.
- चाकू आणि कटिंग बोर्ड: कांदा, लसूण, आले आणि इतर साहित्य कापण्यासाठी याचा वापर करू शकता.
- ब्लेंडर किंवा फूड प्रोसेसर: सॉस व्यवस्थितपणे मिक्स करण्यासाठी याचा वापर करू शकता.
- कुकिंग स्पून : चिकन शिजवताना साहित्य हलवण्यासाठी आणि मिक्सकरण्यासाठी याचा वापर करू शकता.
- कप आणि चमचे मोजण्यासाठी : घटक साहित्यांचे योग्य प्रमाणात मोजमाप करण्यासाठी याचा वापर करू शकता.
- चिमटे: चिकन शिजवताना चिकनचे तुकडे फिरवण्यासाठी याचा वापर करू शकता.
- प्लेट किंवा ट्रे: चिकन मॅरीनेट करण्यासाठी याची गरज लागेल.
- कुकिंग पॉट: भात शिजवण्यासाठी भांड्याची गरज लागेल.
निष्कर्ष ( Conclusion )
चिकनच्या तुकड्यांना मलई ,tomato सॉस,बटर मध्ये शिजवल्यामुळे नवीन रेसिपी तयार झाली. या कल्पकतेमुळे आपल्याला भारतीय शेफचे चातुर्य दिसते.ही डिश चवदार तर आहेच पण यातून प्रोटीन,कॅलरिज,antioxidents या सारखे आरोग्यदायी फायदे सुद्धा मिळतात.म्हणून हा पदार्थ एकदा घरी बनवून बघाच आणि तुमचा अनुभव मित्र आणि तुमच्या कुटुंबियांसोबत नक्की share करा.
इतर आणखी रेसिपीज वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बटर चिकन बनवण्यासाठी लागणारे मुख्य घटक कोणते आहेत? ( What are the ingredients for butter chicken ?)
butter,tomato,chicken हे बटर चिकनसाठी लागणारे मुख्य घटक आहेत.
बटर चिकन करी कशापासून बनवतात ? ( What is butter chicken curry made off ? )
बटर चिकन करी हि मसालेदार टोमॅटो सॉस,बटर आणि चिकन यापासून बनवतात.
भारतात बटर चिकन इतके प्रसिध्द का आहे? (why is butter chicken so popular in india ?)
बटर,लोणी,क्रीम सॉस,मसालेदार टोमॅटो आणि भारतीय मसाल्यांचे उत्कृष्ट मिश्रण तुमच्या तोंडात लगेच विरघळते. साहजिकच त्यामुळे बटर चिकन पदार्थ इतका लोकप्रिय आहे.
आपण बटर चिकन फ्रीज मध्ये ठेवू शकतो का ?
(Can i freeze butter chicken ?)
होय,एका हवाबंद डब्यात ठेवून बटर चिकन तुम्ही फ्रीज मध्ये ठेवले तर ते ३ महिन्यापर्यंत चांगले राहू शकते.
बटर चिकनचा शोध कोणी लावला ? (who invented butter chicken ? )
दिल्लीच्या मोतीमहाल restorant चे संस्थापक कुंदनलाल गुजराल यांनी बटर चिकनचा शोध लावला.
Nutritional Value of Butter Chicken Recipe
fat | 22 gm |
calories | 384 |
cholesterol | 116 mg |
sodium | 703 mg |
pottasium | 935 mg |
carbohydrates | 15 gm |
fibre | 4 gm |
sugar | 8 gm |
protien | 34 gm |
vitamin A | 1942 IU |
vitamin C | 26 mg |
iron | 2 mg |
1 thought on “Butter Chicken Recipe in Marathi ( हॉटेल स्टाईल बटर चिकन )”