Chicken 65 Recipe in Marathi ही स्वादिष्ट रेसिपी लवकरच तुमची आवडती रेसिपी होणार आहे याची मला नक्की खात्री आहे !आजपर्यंत तुम्ही रेस्टॉरंट मध्ये हा पदार्थ खुप आवडीने खाल्ला असेल.रेस्टॉरंट मध्ये हि रेसिपी जितकी चविष्ट बनवली जाते त्यापेक्षा जास्त चाविष्ट आणि चवदार रेसिपी आपण घरी बनवू शकतो हे मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगू शकतो.
दक्षिण भारतातल्या सामान्य लोकांच्या जेवणातला हा एक लोकप्रिय पदार्थ आहे.आजच्या लेखात मी तुम्हाला रेस्टॉरंट पेक्षा भारी चिकन 65 कसे बनवायचे हे सांगणार आहे.त्यासाठी मी लिहिलेल्या रेसिपी प्रमाणे तुम्हाला स्टेप by स्टेप कृती करावी लागेल.
Chicken 65 Recipe in Marathi बनवण्यासाठी पटकन साहित्य गोळा करा आणि सांगितल्याप्रमाणे कृती करा !
तयारीची वेळ | १4 मिनिटे |
स्वयंपाकाची वेळ | १7 मिनिटे |
सर्व्हिंग | ५ लोकांसाठी |
साहित्य (chicken 65 ingredients)
चिकन मॅरीनेट करण्यासाठी
- 600gm बोनलेस चिकन
- हळद ¼ चमचा
- मीठ चवीनुसार
- 1 चमचा गरम मसाला
- 1 चमचा लाल मिरची (चवीनुसार)
- दही (चवीनुसार)
- बारीक चिरलेला कढीपत्ता
- 1 चमचा आले लसून पेस्ट
- 1 चमचा लिंबाचा रस
कृती
- 600gm बोनलेस चिकन चे समान आकारात तुकडे करून घ्या.
- वरील सर्व साहित्य चिकन मध्ये टाका.
- व्यवस्थित मिक्स करून मॅरीनेट करा.
- नंतर फ्रीज मध्ये कमीत कमी 1 तास ते 36 तास झाकून ठेवा.
साहित्य
टेंपरिंग करण्यासाठी
- 1 चमचा लिंबाचा रस
- २ टेबलस्पून पाणी
- मीठ चवीनुसार
- 1 टेबलस्पून लसून पेस्ट
- २ लसणाच्या मोठ्या पाकळ्या चिरून बाजूला ठेवा
- लाल मिरची पावडर चवीनुसार
- टोमॅटो सॉस किंवा सोया सॉस
- ( वरील सर्व साहित्य एका वाटीत मिक्स करून बाजूला ठेवा )
चिकन कोट करण्यासाठी
- 4 टेबलस्पून कॉर्न स्टार्च
- २ टेबलस्पून तांदळाचे पीठ
- २ चमचे दही किंवा एक अंड्याचा पांढरा भाग
कृती (how to make chicken 65)
- आपण फ्रीज मध्ये जे चिकन मॅरीनेट करण्यासाठी ठेवल होतं त्यात 4 टेबलस्पून corn स्टार्च आणि २ टेबलस्पून तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करुण घ्या.
- त्यात एक अंड्याचा पांढरा भाग किंवा २ चमचे दही घालून मिक्स करा. (हे मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त कोरडे नसावे)
- कढई मध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा.
- चिकनचे सर्व तुकडे एकामागून एक तेलात टाकून तळून घ्या.
- २ मिनिटांनंतर हे तुकडे ढवळून घ्या.
- कुरकुरीत आणि हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
- चिकन तळून झाल्यावर टिश्यू पेपर वर टाका ज्यामुळे अतिरिक्त तेल निघून जाईल.
- त्या नंतर कढीपत्ता आणि बिया काढलेल्या हिरव्या मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- २ चमचे गरम तेलात 5-6 कढीपत्ता, २ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- त्यात चविनुसार मीठ,मिरची,लसून पेस्ट आणि २ टेबलस्पून पाणी टाका.
- आता त्यात tomato सॉस आणि तळलेले चिकन टाकून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.
- त्यावर काळी मिरी पावडर शिंपडा.
- आपली चिकन 65 रेसिपी तयार आहे.
- टीश्यु पेपर ठेवलेल्या प्लेट मध्ये काढून घ्या.
- त्यावर कढीपत्ता,हिरव्या मिरच्या,गोल चिरलेला कांदा आणि लिंबू टाकून सर्व्ह करा !
Chicken 65 Recipe बनवताना काही अडचण आली तर खालील व्हिडीओ बघा !
Pro Tips for Chicken 65 Recipe in Marathi (महत्त्वाच्या टिप्स)
- तुम्हाला तळलेलं चिकन आवडत नसेल तर तुम्ही चिकन भाजून घेऊ शकता किंवा Air fry सुद्धा करू शकता.
- तुम्हाला हैद्राबादी चिकन 65 बनवायचं असेल तर टेम्परिंग मध्ये थोडसं दही वापरा. पण हे लगेच सर्व्ह करा कारण चिकनचा कुरकुरीतपणा जाऊ लागतो.
- टोमॅटो सॉस एवजी तुम्ही सोया सॉस सुद्धा वापरू शकता.
- चिकन कोटिंग करताना मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त कोरडे करू नका.
- चिकन मॅरीनेट केल्यावर कमीत कमी 1 तास ते 36 तास झाकून ठेवा त्यामुळे चव अजून वाढते.
- बोनलेस चिकन चे तुकडे करताना समान आकारात तुकडे करा त्यामुळे तळताना सगळे तुकडे समान प्रमाणात तळले जातात.
चिकन 65 खाण्याचे फायदे (benifits of chicken 65)
- प्रोटीन : चिकनमध्ये प्रोटीनचे उत्तम प्रमाण असते जे आपल्या स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी फायदेशीर असते.
- जीवनसत्त्वे आणि खनिजे: चिकनमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
- अँटिऑक्सिडेंट गुणधर्म : चिकन 65 लाल मिरची पावडर, हळद आणि आले यां मसाल्यांनी बनवतात,यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात.
- भूक वाढते : चिकन 65 मसाल्यांमध्ये मॅरीनेड केल्यामुळे चव वाढते आणि पचायला मदत होते आणि भूक वाढते.
जास्त प्रमाणात चिकन 65 खाण्याचे नुकसान (disadvantages of chicken 65)
- कॅलरीजचे जास्त प्रमाण : चिकन 65 मध्ये कॅलरीजचे भरपूर प्रमाण असते,त्यामुळे झपाट्याने वजन आणि चरबी वाढते.
- फॅटचे जास्त प्रमाण : फ्राईड चिकन 65 मध्ये जास्त प्रमाणात फॅट्स असतात, त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्यावर हृदयरोग आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
- सोडियमचे प्रमाण जास्त : चिकन 65 मॅरीनेड करताना मसाल्यांमध्ये जास्त प्रमाणात मीठ असते,ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
- ऍलर्जी: काही लोकांना चिकन 65 बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांची (रंग,मसाले) ऍलर्जी असू शकते.
चिकन 65 रेसीपीचे प्रकार (different types of chicken 65)
- क्लासिक चिकन 65: या प्रकारात मसाले, दही आणि कढीपत्ता आणि चिकनचे तुकडे तळण्याआधी मॅरीनेट केले जातात. यामुळे चिकन चवदार आणि मसालेदार होते.
- बोनलेस चिकन 65: या प्रकारात बोनलेस चिकनचे तुकडे वापरतात,ज्यामुळे ते खायाला सोपे होतात.
- ग्रील्ड चिकन 65: या प्रकारात मॅरीनेट केलेले चिकन तळण्याऐवजी ग्रीलि किंवा बेक करतात.
- केरळ चिकन 65: या प्रकारात खोबरेल तेलाचा आणि बडीशेप, मोहरी आणि कढीपत्ता या मसाल्यांचा वापर करतात.
- हैदराबादी चिकन 65: या प्रकारात चिकन तिखट आणि मसालेदार बनवतात,त्यात मॅरिनेड करताना चिंचेची पेस्ट किंवा लिंबाचा रस टाकतात.
- आंध्र चिकन 65: या प्रकारात चिकन जास्त मसालेदार बनवतात आणि त्यात लाल मिरचीची पेस्ट वापरली जाते.
- चायनीज चिकन 65:या प्रकारात चिकन मॅरीनेड करताना त्यात सोया सॉस, लसूण आणि आले यांचा वापर केला जातो.
- तंदूरी चिकन 65
चिकन 65 सर्व्ह करण्यासाठी (serving suggestions)
- चिकन 65 स्टार्टर म्हणून पुदिन्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा त्यासोबत लिंबाच्या फोडी आणि कांद्याच्या फोडी सर्व्ह करा .
- भातासोबत: चिकन 65 भाताबरोबर खायला एकदम मस्त लागते.तुम्ही तुमच्या आवडीनुसार भात सर्व्ह करू शकता.
- रोटीसोबत: कुरकुरीत नान किंवा रोटी सोबत चिकन 65 सर्व्ह करून रेसिपिचा आनंद लूटा.
- सॅलड सोबत: चिकन ताज्या सॅलेड सोबत सर्व्ह केल्याने जेवणाची मजा अजून वाढते.
- लोणच्यासोबत: रेसिपीची चव वाढवण्यासाठी चिकन 65 सोबत तुमच्या आवडीचे कोणतेही लोणचे सर्व्ह करा.
- रॅप किंवा रोल करून : तुम्ही चिकन चपाती किंवा रोटी मध्ये कोशिंबीर सोबत रोल करून सुद्धा सर्व्ह करू शकता.
- दहि सोबत: रेसिपीचा मसालेदारपणा कमी करण्यासाठी चिकन 65 दही किंवा रायत्या सोबत सर्व्ह करु शकता.
आणखी रेसिपीज वाचा : बटर चिकन रेसिपी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या पदार्थाला चिकन 65 का म्हणतात ?( why it called chicken 65 recipe ? )
या पदार्थाचा शोध १९६५ मध्ये लागला होता म्हणून या पदार्थाला Chicken 65 म्हणतात.चेन्नई मधील ए.एम.बुहारी यांनी या रेसिपीचा शोध लावला.
आपण चिकन 65 फ्रीज मध्ये साठवून ठेवू शकतो का ?( can we store chicken 65 in fridge ? )
शिजवलेले चिकन ६५ आपण फ्रीज मध्ये 3 दिवस साठवून ठेवू शकतो. पण तीन दिवसांपेक्षा जास्त काळ फ्रीज मध्ये साठवून ठेवू नये कारण चिकन खराब व्हायला सुरुवात होते.चिकनच्या रंगात आणि चवीत बदल झाला असेल तर चिकन खराब झाले असे समजावे.खराब चिकन शक्यतो खाऊ नये कारण त्यामुळे विषबाधा होऊ शकते.
चिकन 65 कशासोबत खातात ? ( What is chicken 65 served with ? )
चिकन 65 सर्व्ह करताना लिंबू आणि कांदा सोबत सर्व्ह करा.तुम्ही चिकन 65 फ्राइड राईस सोबत खाऊ शकता.
चिकन 65 खाणे चांगले आहे की वाईट आहे ? ( Is Chicken 65 good or bad for you? )
चिकन 65 खाणे आरोग्यास फायदेशीर आहे.कारण यात प्रोटीनचे प्रमाण उत्तम असते.तुम्हाला याचा तेलकटपणा कमी करायचा असला तर तुम्ही चिकन कमी तेलात तळू शकता किंवा ऐअर फ्राय करू शकता
ताप असताना आपण चिकन ६५ खाऊ शकतो का? ( Can we eat Chicken 65 during fever? )
होय,ताप आलेला असताना आपण चिकन 65 खाऊ शकतो.
मधुमेह असलेल्या व्यक्ती चिकन ६५ खाऊ शकतात का? ( Can diabetic eat Chicken 65? )
होय,मधुमेह असलेल्या व्यक्तीने चिकन 65 खाणे आरोग्यास फायदेशीर आहे.कारण यात प्रोटीनचे प्रमाण उत्तम असते.
चिकन ६५ म्हणजे काय ? ( what is chicken 65 )
Chicken 65 हा मुळचा दक्षिण भारतीय पदार्थ आहे.या रेसिपीमध्ये चिकन डीप फ्राय केले जाते.चिकनचे तुकडे अंडी, मसाले,मैदा,दही,आणि कढीपत्ता या मध्ये मुरवले आणि नंतर कुरकुरित व सोनेरी होईपर्यंत तळले जातात.त्यामुळे चिकन बाहेरून कुरकुरीत आणि आतून मउ व चवदार होते.
चिकन 65 चा शोध कोणी लावला? ( Who invented chicken 65 )
या रेसिपीचा शोध चेन्नई मध्ये ए.एम.बुहारी यांनी १९६५ मध्ये लावला होता.म्हणून त्यांनी या रेसिपीला चिकन 65 हे नाव दिले.दक्षिण भारतात चिकन 65 विविध शैलीमध्ये (हैद्राबादी,मदुराई,आंध्र,तामिळनाडू )बनवतात.हि रेसिपी बनवण्याची पद्धत एकदम साधी आणि सोपी आहे कारण फक्त चिकन मॅरीनेट करायचं आणि तळून घ्यायचं असत.जर तुम्हाला तिखट फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही त्यात कढीपत्ता,लसून,हिरव्या मिरची ची फोडणी देऊ शकता.
chicken 65 nutrition ( amount per serving )
Calories | 532 |
Fat | 36 gm |
cholesterol | 112 mg |
sodium | 647 mg |
potassium | 372 mg |
carbohydrates | 16 gm |
protien | 31 gm |
Vitamin A | — |
Vitamin C | 51 mg |
Cacium | 53 mg |
iron | 2.1 mg |
4 thoughts on “Chicken 65 Recipe in Marathi ( कुरकुरीत व चटपटीत रेसिपीचा आनंद घ्या )”