Egg Biryani Recipe in Marathi Language

आज आपण हैद्राबादी Egg Biryani Recipe in Marathi Language मध्ये बनवायला शिकणार आहोत.अंडा बिर्याणी बनवण्याचे बरेच प्रकार आहेत.त्या त्या प्रकारानुसार अंडा बिर्याणी बनवण्याची पद्धत आणि घटक पदार्थ पण बदलतात.मी तुम्हाला आज घरच्या घरीच हॉटेल पेक्षाही भारी आणि चवदार अंडा बिर्याणी कशी बनवायची या बद्दल माहिती सांगणार आहे.

आज आपण जी Egg Biryani बनवणार आहे ती कमी तिखट,कमी तेलकट,किंवा कमी मसालेदार असेल,कारण बऱ्याच जणांना जास्त तिखट किंवा मसालेदार खाणे आवडत नाही.पण जर तुम्हाला तिखट आणि मसालेदार खाणे आवडत असेल तर तुम्ही तिखटाचे प्रमाण वाढवू शकता.बिर्याणी शक्यतो तिखट आणि मसालेदार असेल तरच जास्त भारी लागते.

Egg Biryani मोकळी होण्यासाठी शक्यतो बासमती तांदूळ वापरणे केव्हाही चांगले असते. हा तांदूळ जास्त शिजवायचा नसतो कारण जास्त शिजवल्यामुळे भाताचे तुकडे होतात आणि बिर्याणी चिकट होते.बिर्याणी चांगली होण्यासाठी मंद आचेवर आणि योग्य प्रमाणात शिजवली पाहिजे.जास्त शिजवल्यामुळे किंवा उच्च आचेवर शिजवल्यामुळे बिर्याणीची चव बिघडू शकते.

Egg Biryani Recipe in Marathi Language बनवण्यासाठी पटकन साहित्य जमा करा आणि खाली सांगितल्या प्रमाणे कृती करा !

तयारीची वेळ२० मिनिटे
स्वयंपाकाची वेळअर्धा तास
सर्व्हिंग्स३ लोकांसाठी

साहित्य (egg biryani ingredients list)

कपचे प्रमाण २४० मिली

  • दही १ चमचा
  • १ चमचा केवड्याचे पाणी
  • चिमूटभर केशर
  • दही गरजेनुसार
  • ३ चमचे दूध
  • पुदिना आणि कोथिंबीरीची पाने
  • मीठ चवीनुसार
  • लाल मिरची चवीनुसार
  • बिर्याणी मसाला १ चमचा
  • १ हिरवी मिरची
  • आले लसूण पेस्ट १ चमचा
  • १ स्ट्रॅन्ड गदा
  • ५ लवंगा
  • डालचिनीचा तुकडा १ इंच
  • हिरवी वेलची ४
  • १ काली वेलची
  • कापलेला कांदा १
  • तमालपत्र १
  • १ तारा बडीशेप
  • २ चमचे तेल
  • अर्धा चमचा शाही जिरे
  • उकडलेले अंडे (गरजेनुसार)
  • ३ हिरव्या वेलची
  • अर्धा च. शाही जिरे
  • दीड कप बासमती तांदूळ

कृती (how to make egg biryani)

  • तुमच्या गरजेनुसार अंडी उकडून घ्या.काही अंडे सोलून त्यांना काटा चमच्याने छिद्रे बनवून घ्या.काही अंडे अर्धे कापून बाजूला ठेवा.
  • त्यानंतर बासमती तांदूळ धुवून घ्या आणि अर्धा तासासाठी पाण्यात भिजत ठेवा.अर्ध्या तासानंतर उकळलेल्या पाण्यात जिरे,वेलची आणि भिजवलेला तांदूळ घालून ९० टक्के भात शिजवून घ्या.
Egg Biryani Recipe in Marathi Language
Egg Biryani Recipe in Marathi Language
  • गरजेनुसार कांदे उभे कापून घ्या आणि सोनेरी होईपर्यंत तळून प्लेट मध्ये काढून बाजूला ठेवून द्या.
  • ३ चमचे दुधात चिमूटभर केशर भिजवा आणि वाटी बाजूला ठेवून द्या.
  • त्यानंतर कढई मध्ये २ चमचे तेलात सर्व मसाले घाला आणि सुगंध येईपर्यंत परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात आले लसणाची पेस्ट घालून २ मिनीटे परतून घ्या.
Egg Biryani Recipe in Marathi Language
Egg Biryani Recipe in Marathi Language
  • त्यानंतर त्यात तुमच्या चवीनुसार लाल मिरची पावडर आणि १ चमचा बिर्याणी मसाला घालून परतून घ्या.
  • त्यानंतर तुमच्या चविनुसार किंवा गरजेनुसार दही आणि चवीनुसार मीठ आणि पुदीन्याची पाने घालून मिक्स करा.
Egg Biryani Recipe in Marathi Language
Egg Biryani Recipe in Marathi Language
  • त्यानंतर त्यात उकडलेले अंडे आणि तळलेला कांदा घालून ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवून घ्या.
  • त्यानंतर कुकरमध्ये शिजवलेल्या भाताचा थर लावून त्यावर ग्रेव्हीचा थर पसरवा.
  • ग्रेव्ही वर परत भाताचा थर लावा.
  • पॅन मध्ये अर्धे कापलेले अंडे मीठ,लाल तिखट आणि बिर्याणी मसाला घालून भाजून घ्या आणि भातावर पसरवा.
  • त्यावरून केसरचे दूध,तळलेला कांदा आणि पुदिना व कोथिंबीर पसरवा.
Egg Biryani Recipe in Marathi Language
Egg Biryani Recipe in Marathi Language
  • कुकरचे झाकण बंद करून तापलेल्या तव्यावर ठेऊन बिर्याणी वाफेवर शिजू द्या.
Egg Biryani Recipe in Marathi Language
Egg Biryani Recipe in Marathi Language
  • नंतर गरम गरम बिर्याणी कोशिंबीर सोबत सर्व्ह करा.

Egg Biryani Recipe बनवताना काही अडचण आल्यास खालील व्हिडिओ बघा !

Egg Biryani बनवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स (recipe tips in marathi)

  • अंडा बिर्याणी चांगली आणि मोकळी होण्यासाठी बासमती तांदूळ वापरा.
  • तांदळू शिजवत असताना पूर्णपणे शिजवू नका कारण भात पूर्णपणे शिजल्यावर भात चिक्कट होतो आणि भाताचे तुकडे होतात.
  • तांदूळ शिजवायच्या आधी अर्धा तास भिजवत ठेवायला विसरु नका.तांदूळ भिजत ठेवल्यामुळे भात लवकर आणि चांगला शिजतो.
  • बिर्याणी बनवताना तुपाचा वापर केल्याने बिर्याणीला अजून भारी चव येते.
  • अंडा बिर्याणी वर केशर दुधाचा आणि केवड्याच्या पाण्याचा शिडकावा केल्यावर बिर्याणीला सुगंधी फ्लेवर येतो.
  • तुम्हाला तिखट खाणे आवडत असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखटाचे आणि मसालेदारपणाचे प्रमाण कमी जास्त करू शकता.
  • बिऱ्याणी शिजल्यावर १५ मिनिटांसाठी हवाबंद कुकर मध्ये वाफेवर शिजवा.
  • बिर्याणी सर्व्ह करताना हलक्या हाताने मिक्स करून सर्व्ह करा.

Egg Biryani खाण्याचे फायदे (what are the benifits of eating eggs)

  • भरपूर प्रोटीन प्रमाण : अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते ज्यामुळे शरीरात स्नायू वाढतात आणि बळकट सुद्धा होतात.जे लोक व्यायाम करतात त्यांच्यासाठी प्रोटीन मिळवण्यासाठी अंडे खाणे उत्तम पर्याय आहे
  • जीवनसत्त्वे आणि खनिजांचे उत्तम प्रमाण : अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई आणि बी12 जीवनसत्त्वे तसेच लोह आणि सेलेनियम इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात.हि खनिजे आणि जीवनसत्वे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची असतात.
  • हृदयाचे आरोग्य चांगले राहते : अंड्यांमध्ये निरोगी चरबी आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात,ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • एनर्जी बूस्ट करण्यासाठी : बिर्याणीच्या तांदळात कार्बोहायड्रेट्स चे प्रमाण भरपूर असते ज्यामुळे शरीरात भरपूर एनर्जी टिकून राहते,शिवाय दिवसभर पोट भरलेले राहते.
  • अँटिऑक्सिडंट्स: बिर्याणीसाठी वापरले जाणारे मसाले आणि औषधी वनस्पती,जसे की हळद, धणे आणि जिरे,यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते आणि रोगांपासून संरक्षण होते.
  • पचन चांगले होते : बिर्याणीमधील काही घटक जसे की दही आणि पुदीना, पचनास मदत करतात आणि आतड्यांचे आरोग्य वाढवतात.

Egg Biryani बनवण्याचे विविध प्रकार (variations)

  • हैदराबादी अंडा बिर्याणी: या रेसिपीमध्ये टोमॅटो, कांदे आणि मसाल्यांनी बनवलेल्या मसालेदार ग्रेव्हीचा वापर करतात,ज्यात उकडलेले अंडे असतात.
  • केरळ स्टाईल अंडा बिर्याणी: या रेसिपीमध्ये,अंडे नारळाच्या दुधाचा वापर करून बनवलेल्या ग्रेव्हीमध्ये हळद, धणे आणि जिरे या मसाल्यांमध्ये शिजवतात, ज्यामुळे त्याला एक वेगळी दक्षिण भारतीय चव येते.
  • पंजाबी अंडा बिर्याणी: ही रेसीपी टोमॅटो आणि कांद्याच्या ग्रेव्हीत पंजाबी गरम मसाला घालून बनवतात, ज्यामुळे त्याला एक मसालेदार आणि तिखट चव येते.
  • ढाबा स्टाईल अंडा बिर्याणी: ही रेसिपी जास्त चवदार असते,अंडी आणि तांदूळ मसालेदार टोमॅटो आणि दही पासून बनवलेल्या ग्रेव्हीमध्ये एकत्र शिजवतात.
  • अंडा दम बिर्याणी: या रेसिपीमध्ये, अंडी अर्धवट शिजवलेल्या तांदळावर थर ठेवण्यापूर्वी मसालेदार दहिच्या मिश्रणात मॅरीनेट करतात आणि मंद आचेवर शिजवतात.
  • व्हेज अंडा बिर्याणी: या रेसिपीमध्ये तुम्ही अंड्यांसोबत गाजर, वाटाणे आणि बटाटे या मिक्स भाज्या घालू शकता.

Egg Biryani सर्व्ह करण्यासाठी (serving suggestions)

  • रायता: काकडी किंवा कांदा रायता (किसलेल्या काकडी किंवा बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये दही, मीठ, मिरपूड आणि भाजलेले जिरे पूड घालून रायता बनवा आणि बिरयाणी सोबत सर्व्ह करा.)
  • कोशिंबीर: कापलेल्या काकड्या, टोमॅटो, कांदे आणि लिंबाचा रस यांची ताजी कोशिंबीर बनवून तुम्ही बिर्याणी सोबत सर्व्ह करू शकतात.
  • पापड: तुम्ही कोणत्याही प्रकारचे तळलेले किंवा भाजलेले कुरकुरीत पापड बिर्याणी सोबत सर्व्ह करू शकता.
  • लोणचे: मसालेदार आंब्याचे किंवा लिंबाचे लोणचे बाजूला करून डिशला तिखट चव आणता येते.
  • चटणी: बिर्याणीची चव वाढवण्यासाठी तुम्ही पुदिना किंवा कोथिंबीरीची चटणी बनवू शकता आणि बिर्याणी सोबत सर्व्ह करू शकता.
  • लिंबू : बिर्याणीचा चटपटीतपणा वाढवण्यासाठी बिर्याणीमध्ये लिंबू पिळून सर्व्ह करा.

तुम्हाला हि रेसिपी सुद्धा नक्की आवडेल : ढाबा स्टाईल अंडा करी ! 

Egg Biryani Recipe in Marathi Language बनवण्यासाठी किचनमध्ये लागणारे साहित्य (what are kitchen equipments)

  • मोठे भांडे किंवा कुकर : तांदूळ आणि अंडी शिजवण्यासाठी.
  • तळण्याचे पॅन: कांदे, मसाले आणि अंडी भाजण्यासाठी.
  • चमचा: ढवळण्यासाठी आणि घटक मिसळण्यासाठी.
  • चाकू आणि कटिंग बोर्ड: कांदे, टोमॅटो आणि इतर भाज्या चिरण्यासाठी.
  • मोजण्याचे चमचे आणि कप: मसाले आणि इतर घटक अचूक प्रमाणात मोजण्यासाठी .
  • बाउल : अंडी मॅरीनेट करण्यासाठी आणि बिर्याणी एकत्र करण्यासाठी.
  • गाळणी : उकळलेले तांदूळ पाण्यातून काढण्यासाठी.
  • ॲल्युमिनियम फॉइल किंवा घट्ट बसणारे झाकण: बिर्याणी शिजवताना भांडे झाकून वाफ बंद करण्यासाठी.

अंडा बिर्याणी कशापासून बनवतात ?(What is egg biryani made of?)

अंडा बिर्याणी साठी मुख्य पदार्थ अंडी आणि भात हे आहेत.पण अंडा बिर्याणी बनवण्याचे भरपूर प्रकार आहे.प्रकारानुसार बनवण्याची पद्धत आणि त्यातील घटक बदलत असतात.

अंडा बिर्याणी आरोग्यासाठी चांगली असते का? ( Is egg biryani good for health? )

होय, अंडा बिर्याणी खाणे शरीरासाठी खुप फायदेशीर असते कारण यात भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आनि खनिजे असतात.अजून फायदे वाचण्यासाठी पूर्ण लेख वाचा.

अंडा पुलाव आणि अंडा बिर्याणीमध्ये कोणता फरक असतो ?(What is the difference between egg pulao and egg biryani?)

बिर्याणी बनवताना तांदूळ पाण्यात वेगळा शिजवला जातो आणि नंतर ग्रेव्ही मध्ये शिजवला जातो आणि पुलावमध्ये तांदूळ आणि अंडे पाण्यात एकत्र शिजवले जातात आणि त्यातील पाणी पूर्णपणे आटवले जाते.

बिर्याणीसाठी कोणता तांदूळ चांगला आहे? (Which chawal is best for biryani?)

कोणत्याही प्रकारची बिर्याणी बनवायची असेल तर बासमती तांदूळ उत्तम असतो.

Biryani Nutrition Value

calories523
fat14 gm
cholesterol10 mg
sodium111 mg
pottasium365 mg
carbohydrates89 gm
fibre5 gm
sugar7 gm
protien11 gm
vitamin A411 IU
vitamin C6.7 mg
calcium158 mg
iron2.5 mg
share this :

Leave a comment