बऱ्याच लोकांना व्हेज पुलाव खायला आवडतो म्हणून आज आपण घरघुती पद्धतीने चवदार pulao recipe in marathi language बनवायला शिकणार आहोत.व्हेज पुलाव झटपट तयार होणारा पदार्थ आहे.जर तुम्हाला पटकन तयार होणारा परंतु चवदार पदार्थ खायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी व्हेज पुलाव उत्तम पर्याय आहे.
व्हेज पुलावमध्ये सुगंधी मसाल्यांसोबत तुमच्या आवडत्या भाज्या शिजवलेल्या असतात.व्हेज पुलावसाठी मी जुना बासमती तांदूळ वापरला आहे.त्यामुळे पुलाव मोकळा आणि मऊ होतो.
जर तुम्हालाही व्हेज पुलावच्या मसालेदार चवीचा अनुभव घ्यायचा असेल तर सांगितल्या प्रमाणे कृती करा आणि मित्रांना तुमच्या स्वयंपाकाचे स्कील दाखवून इम्प्रेस करा !
pulao recipe in marathi language बनवण्यासाठी पटकन साहित्य जमवा आणि कृती करा !
तयारी | ५ मिनिटे |
स्वयंपाक | २५ मिनिटे |
सर्व्हिंग | २ लोकांसाठी |
साहित्य (veg pulao recipe ingredients)
- १ कप जुना बासमती तांदूळ
- हिरवी मिरची (चवीनुसार)
- कोथिंबीर (बारीक कापलेली)
- १ चमचा गरम / बिर्याणी मसाला
- ३ चमचे दही
- मीठ (चवीनुसार)
- कांदा (कापलेला)
- १ चमचा आले लसून पेस्ट
- लाल मिरची पावडर (चवीनुसार)
- १ कापलेला टोमाटो
- लिंबाचा रस (चवीनुसार)
- पुदिना (कापलेला)
- अर्धा चमचा हळद
- तेल / तूप २ चमचे
मिक्स भाज्या
- बटाटा (चौकोनि कापलेला)
- १ कप हिरवा वाटाणा
- कापलेला गाजर
- फ्लोवर (ऐच्छिक)
- कोबी (ऐच्छिक)
- सोयाचंक (ऐच्छिक)
मसाले
- १ तमालपत्र
- ३ लवंगा
- १ इंच दालचिनी
- ३ हिरवी वेलची (इलायची)
- अर्धा चमचा शाही जिरे
- तारा बडीशेप १ (ऐच्छिक)
तयारी
- तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.त्यानंतर २० मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा.
- २० मिनिटांनंतर त्यातले पाणी काढून,तांदूळ कोरडा करून बाजूला ठेवून द्या.
- सगळ्या भाज्या धुवून एका आकारात कापून बाजूला ठेऊन द्या.
कृती (how to make pulao)
- कुकर मध्ये २ चमचे तेलात पुढील मसाले १ मिनिटे परतून घ्या – (१ तमालपत्र,१ इंच दालचिनी,३ हिरव्या वेलची,३ लवंगा,अर्धा चमचा शाही जिरे,१ तारा बडीशेप.
- त्यानंतर कापलेला कांदा आणि १ कापलेली हिरवी मिरची त्यात टाकून कांदा सोनेरी होई पर्यंत परतून घ्या.
- त्यांतर त्यात १ चमचा आले लसूण पेस्ट घालून २ मिनिटे परतून घ्या.
- त्यानंतर त्यात सर्व कापलेल्या भाज्या टाका आणि उच्च आचेवर ३ मिनिटे परतून घ्या.
- त्यांतर त्यात पुढील मसाले टाका – (पुदिन्याची पाने,कोथिंबीर,मिरची पावडर,हळद,मीठ,१ चमचे गरम / बिर्याणी मसाला,कापलेला टोमाटो,३ चमचे दही)
- त्यानंतर टमाटे मऊ होईपर्यंत २ मिनिटे उच्च आचेवर शिजवा.
- सुगंध येऊ लागल्यावर मंद आचेवर शिजवा.
- त्यांतर दुसऱ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात मीठ टाकून उकळून घ्या (पाणी खारट हवे)
- त्यांतर या उकळलेल्या पाण्यात भात टाकून घ्या.
- कुकरचे झाकण बंद करून मंद आचेवर २ शिट्ट्या होई पर्यत शिजवून घ्या.
- त्यांतर १५ मिनिट कुकरचे झाकण बंद राहू द्या जेणेकरून वाफेवर व्हेज पुलाव चांगला शिजेल.
- त्यांतर २ मिनिटांनी कुकर मधली हवा सोडून द्या.
- त्यानंतर व्हेज पुलाव प्लेट मध्ये काढून घ्या.
- कोथिंबीर टाकून,कांदा,लिंबू आणि कोशिंबीर सहित सर्व्ह करा !
pulao recipe बनवताना काही अडचण आल्यास खालील व्हिडिओ बघा !
pulao recipe बनवण्यासाठी महत्वाच्या टिप्स (cooking tips in marathi)
- तांदूळ : व्हेज पुलावसाठी जुना बासमती तांदूळ वापरणे उत्तम आहे.यामुळे भात मोकळा आणि मऊ होतो.तुम्ही सेला बासमती तांदूळ किंवा कैमा तांदूळ सुद्धा वापरू शकता.
- तूप / तेल : तेल किंवा तूप वापरल्यामुळे व्हेज पुलाव मऊ होतो तसेच तुपाचा वापर केल्यामुळे व्हेज पुलावला चवदार फ्लेवर येतो.
- भाज्या : व्हेज पुलावसाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरू शकता.तसेच सगळ्या भाज्या समान आकारात कापून घ्या.तुम्ही जर सोयाचंक वापरत असाल तर आधी गरम पाण्यात भिजवा आणि पिळून त्यातील पाणी पूर्ण पणे काढून वापरा.
- मसाले : व्हेज पुलाव चवदार होण्यासाठी योग्य प्रमाणात आणि चांगले मसाले वापरा. मी गरम मसाला वापरला आहे तुम्ही बिर्याणी मसाला सुद्धा वापरु शकता.
- दही : जास्त आंबट दही वापरू नका.वापरण्याच्या आधी चांगले फेटून घ्या,त्यामुळे दही फाटत नाही.
- सुगंध : पुलावला सुगंध आणि फ्लेवर येण्यासाठी तुम्ही चमचाभर केवड्याचे पाणीकिंवा गुलाबपाणी सुद्धा टाकू शकता.
- तांदूळ भिजवायला विसरू नका.
- भाज्या लहान आकारात कापू नका.
- भात जास्त शिजवू नका.
- भात ९० % शिजला पाहिजे.
हि रेसिपी सुद्धा नक्की आवडेल :चवदार व्हेज बिर्याणी
पुलाव खाण्याचे फायदे (pulao benifit)
- पोषक तत्वांचे प्रमाण : व्हेज पुलावमध्ये वेगवेगळ्या भाज्या असतात,त्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
- फायबरचे जास्त प्रमाण : व्हेज पुलावमध्ये भाज्या आणि भातामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते,त्यामुळे पचनास मदत होते आणि आतडे निरोगी राहतात.
- कॅलरीजचे प्रमाण कमी : नॉनव्हेज बिर्याणीच्या तुलनेत, व्हेज पुलावमध्ये कॅलरी आणि सॅच्युरेटेड फॅट्स कमी प्रमाणात असतात.
- हृदयाचे आरोग्य: व्हेज पुलावमध्ये मध्ये असणारे पदार्थ (भाज्या आणि हळदी, मसाले) दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंटने भरपूर असतात.हे मसाले हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.
- व्हेज पुलावमध्ये कार्बोहायड्रेट्स,प्रोटीन आणि फॅट्स असतात.
- वजन कमी होण्यास मदत : व्हेज पुलावमध्ये असलेल्या फायबरमुळे दिवसभर पोट भरलेले राहते,त्यामुळे अनावश्यक भूक लागत नाही त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
- रोगप्रतिकार शक्ती वाढते: व्हेज पुलावमध्ये असलेल्या मसाल्यांमध्ये (हळद, धणे आणि जिरे) रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात.
जास्त प्रमाणात पुलाव खाण्याचे दुष्परिणाम (side effects)
- फूड पोईझन : जर पुलाव नीट शिजवला नाही किंवा तर त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात आणि अन्न विषबाधा होऊ शकते.
- पाचन समस्या: ज्या लोकांना मसालेदार पदार्थ खायची सवय नसेल अश्या लोकांना पुलाव खाल्ल्यावर पोट फुगणे, गॅस किंवा जुलाब इत्यादी पाचन समस्या होऊ शकतात.
- कॅलरी आणि फॅट्सचे जास्त प्रमाण : पुलावमध्ये कॅलरी आणि फॅट्स जास्त असतात,त्यामुळे वजन लवकर वाढते.
व्हेज पुलावचे विविध प्रकार (different types of pulao recipes)
- हैदराबादी व्हेज पुलाव: हा पुलाव बनवण्यासाठी बासमती तांदळाचा वापर केला जातो.हि बिर्याणी सुगंधी असते.हा पुलाव बनवताना थर लावून बनवतात.
- लखनौवी व्हेज पुलाव: या पुलावमध्ये भाज्या, दही आणि मसाले वापरलेले असतात.शिवाय मंद आचेवर शिजवतात त्यामुळे फ्लेवर्स व्यवस्तित मिक्स होतात.
- काश्मिरी व्हेज पुलाव: हा पुलाव बनवताना त्यात काजू, बदाम आणि मनुका हे ड्राय फ्रुट घालुन भाज्या आणि मसाले भातामध्ये शिजवतात.
- चेट्टीनाड व्हेज पुलाव: हा पुलाव मसालेदार आणि चवदार असतो या पुलावमध्ये बासमती तांदूळ आणि भाज्या,नारळाचे दूध आणि मसाल्यांचा वापर करतात. यात स्टार बडीशेप, काळी वेलची आणि बडीशेप हे मसाले वापरतात.
- थलासेरी व्हेज पुलाव: हा पुलाव जीराकसाला भाता पासून बनवली जाते. या मध्ये भाज्या, नारळाचे दूध आणि दालचिनी, लवंगा आणि वेलची हे मसाले वापरले जातात.
पुलाव सर्व्ह करण्यासाठी (Serving suggestions)
- रायता: दही पासून बनवलेल्या रायत्या सोबत व्हेज पुलाव सर्व्ह करा.
- कोशिंबीर: काकडी, टोमॅटो, कांदे,लिंबू,कोथिंबीर यांपासून बनवलेले कोशिंबीर व्हेज पुलाव सोबत सर्व्ह करा.
- पापड: व्हेज पुलाव सोबत तुम्ही तुमच्या आवडीचे कोणत्याही प्रकारचे तळलेले किंवा भाजलेले कुरकुरीत पापड सर्व्ह करा.
- लोणचे:व्हेज पुलाव सोबत तुम्ही तुमच्या आवडीचे कोणत्याही प्रकारचे लोणचे सर्व्ह करू शकता.
- चटणी: व्हेज पुलाव सोबत तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबीरीची चटणी सर्व्ह करू शकता.
- तळलेले कांदे : कुरकुरीत तळलेले कांदे बिर्याणीच्या वरच्या बाजूस पोत आणि चव वाढवण्यासाठी शिंपडले जाऊ शकतात.
पुलाव बनवण्यासाठी किचनमध्ये लागणारे साहित्य (what are kitchen equipments)
- जाड तळाचे भांडे किंवा डच ओव्हन : पुलाव शिजवण्यासाठी, याचा वापर करा कारण त्यामुळे पुलाव जळत नाही.
- पॅन : पुलावचा थर लावायच्या आधी भाज्या आणि मसाले परतुन घेण्यासाठी पॅन किंवा कढई वापरा.
- मिक्सिंग बाऊल्स: भाज्या मॅरीनेट करण्यासाठी आणि पुलावसाठी पदार्थ मिक्स करण्यासाठी मिक्सिंग बाऊल्सचा वापर करा.
- चाकु आणि कटिंग बोर्ड: भाज्या आणि इतर पदार्थ कापण्यासाठी याचा वापर करा.
- गाळणी: तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर जास्तीचे पाणी काढून टाकण्यासाठी याचा वापर करा.
- मोजण्याचे कप आणि चमचे: पदार्थांचे योग्य प्रमाण मोजण्यासाठी याचा वापर करा.
- चमचा: पुलाव शिजवताना मिक्स करण्यासाठी आणि सर्व्ह करण्यासाठी.
- ॲल्युमिनियम फॉइल : पुलाव शिजवताना भांडे झाकून वाफ अडकवण्यासाठी याचा वापर करा.
- प्लेट्स आणि सर्व्हिंग स्पून: पुलाव सर्व्ह करण्यासाठी याचा वापर करा.
- पर्यायी: प्रेशर कुकर : प्रेशर कुकर मध्ये भात लवकर आणि चांगला शिजतो.
FAQ About Pulao Recipe in Marathi
पुलाव कशापासून बनवतात ? ( What is pulao made of? )
भात, भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पतीं एकत्र शिजवून पुलाव बनवला जातो.
बिर्याणी व पुलावमध्ये कोणता फरक असतो ? ( What is difference between biryani and pulao? )
पुलाव बनवताना मसाल्यांच्या पाण्यात भात शिजवला जातो , तर बिर्याणी बनवताना भातावर गरम पाणी ओतले जाते.
घरी बनवलेला पुलाव आरोग्यदायी असतो का? ( Is homemade pulao healthy? )
घरी बनवलेला व्हेज पुलाव आरोग्यदायी असतो कारण त्यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे उत्तम प्रमाण असलेल्या भाज्या असतात.भाज्यामध्ये असलेलेल्या फायबरमुळे पचन नियंत्रित होते.
पुलाव बनवण्यासाठी कोणता तांदूळ चांगला असतो ? ( Which rice is best for pulao? )
पुलाव बनवण्यासाठी बासमती तांदूळ उत्तम असतो.
1 किलो पुलाव भात किती लोक खाऊ शकतात?(How many people can eat 1 kg pulao rice?)
६ ते ८ जन १ किलो पुलाव खाऊ शकतात.
Pulao Nutrition
calories | 512 |
fat | 13 gm |
sodium | 53 mg |
pottasium | 383 mg |
carbohydrates | 94 gm |
fibre | 7 gm |
sugar | 11 gm |
protien | 11 gm |
vitamin A | 4623 IU |
vitamin C | 12.9 mg |
calcium | 71 mg |
iron | iron 2.3 mg |