आज आपण रेस्टौरंट स्टाईल Rasgulla Recipe in Marathi Language मध्ये बनवायला शिकणार आहोत.हि भारतातील सगळ्यात जास्त फेमस रेसिपी आहे.हि बंगाली मिठाई सर्व गोड पदार्थांपैकी सगळ्यात जास्त फेमस आहे.लग्न समारंभ असो वा इतर कोणताही खास समारंभ असो.तेव्हा स्वीट डिश मध्ये रसगुल्ला नक्की असतोच.
रसगुल्ला आवडत नसेल असा एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही.लहानांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच हि मिठाई आवडते.
Rasgulla दुधापासून बनवतात आणि साखरेच्या पाकात भिजवतात त्यामुळे याचा गोडवा वाढतो.मिठाईच्या दुकानातून हि मिठाई आणायची म्हंटल तर खूप महाग असते.शिवाय कमी क्वांटिटीमध्ये मिळतात त्यामुळे आपल मन भरत नाही.
त्यामुळे आपण आज Rasgulla Recipe घरी बनवायला शिकणार आहोत.घरी बनवलेले रसगुल्ले तुम्ही ४ दिवस साठवून ठेवू शकता आणि कधीही आणी कितीही खाऊ शकता.
Rasgulla Recipe in Marathi Language बनवण्यासाठी पटकन साहित्य जमा करा आणि खाली सांगितल्याप्रमाणे कृती करा !
तयारीची वेळ | १५ मिनिटे |
स्वयंपाकाची वेळ | अर्धा तास |
सर्व्हिंग | ६ लोकांसाठी |
साहित्य (rasgulla ingredients)
- १ लिटर दूध (मलईदार)
- ३ हिरव्या विलायची
- ४ कप पाणी
- साखर चवीनुसार
- २ चमचे लिंबाचा रस
- केसर (गार्निश करण्यासाठी)
कृती (how to make rasgulla)
- रसगुल्ला बनवण्यासाठी मध्यम आचेवर १ लिटर दुध पातेल्यात गरम करा.दुध गरम करताना त्यात २ चमचे लिंबाचा रस टाकून दुध फाटेपर्यंत हळू हळू ढवळत रहा.
- दुध फाटल्यावर मध्यम आचेवर दुध उकळून घ्या. दुध फाटल्यावर त्यातील पाणी पूर्ण पणे वेगळे झालेले दिसेल.
- त्यानंतर एका सुती कापडात दुध गाळून त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका.त्यावर साधे पाणी टाकून पिळून घ्या ज्यामुळे लिंबाचा आंबटपणा निघून जाईल.
- तयार झालेलं पनीर सुती कापडात पिळून अर्धा तासासाठी लटकून ठेवा.
- नंतर पनीर प्लेट मध्ये काढून व्यवस्थित नरम होईपर्यंत मळून घ्या.
- त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या.
- त्यानंतर एका पातेल्यात चार कप पाणी घालून त्यात तुमच्या चविनुसार साखर आणि विलायची घालुन उकळून घ्या.
- पाणी (पाक) उकळू लागल्यावर त्यात रसगुल्ले टाका.
- पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर रसगुल्ले शिजवून घ्या. ५ मिनिटांनी झाकण काढून रसगुल्ले ढवळून घ्या.परत त्यावर झाकण ठेवून १० मिनिटे मध्यम आचेवर शिजवा.
- यानंतर रसगुल्ले बाउलमध्ये काढून घ्या आणि ६ तास थंड होऊ द्या.
- सर्व्ह करताना त्यावर केशर घालून गार्निश करा आणि सर्व्ह करा.
Rasgulla Recipe बनवताना काही अडचण आल्यास खालील व्हिडीओ बघा !
Rasgulla Recipe बनवण्यासाठी महत्वाच्या टिप्स (cooking tips in marathi)
- रसगुल्ला बनवताना जास्त फॅट असलेले दूध वापरा.कमी फॅट असलेले दूध वापरु नका.
- ऍसिडिक एजंट: दूध फाटण्यासाठी लिंबाचा रस किंवा व्हिनेगरचा वापर करा.दुध फाडताना दूध जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्या.
- पनीर मळणे: पनीर पूर्णपणे गुळगुळीत मळून घ्या.त्यात गाठी राहू देऊ नका.गोळे बनवताना त्याला आकार देता आला पाहिजे इतके मऊ पीठ मळून घ्या.
- रसगुल्ल्याचा आकार: रसगुल्ल्याचे जास्त मोठे गोळे बनवू नका कारण ते पाकात शिजल्यावर ते फुगून मोठे होतात.त्यामुळे गोळे लहान करा.
- रसगुल्ले मोठ्या भांड्यात शिजवा.
- रसगुल्ले शिजवताना मंद आचेवर शिजवा ज्यामुळे ते व्यवस्थित शिजतील.
- जेव्हा तुम्ही रसगुल्ला साखरेच्या पाकात घालाल तेव्हा साखरेचा पाक कोमट असायला पहिजे,गरम नसावा.
- शिजवण्याची वेळ: रसगुल्ले मंद आचेवर सुमारे 15-20 मिनिटे शिजवून घ्या.जास्त वेळ शिजवल्यामुळे रसगुल्ले रबरासारखे बनतात.
- रसगुल्ले साखरेच्या पाकातच थंड होण्यासाठी ठेवा ज्यामुळे ते चांगले मुरतात आणि मऊ आणि रसदार होतात.
- सर्व्हिंग: थंडगार रसगुल्ला केशरने गार्निश करून सर्व्ह करा.
तुम्हाला हि रेसिपी सुद्धा नक्की आवडेल : गुलाबजाम रेसिपी
रसगुल्ला खाण्याचे फायदे (benifits)
- प्रोटीन : रसगुल्ले दुधापासून बनवलेले असतात त्यामुळे त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते.
- एनर्जी मिळते : रसगुल्ल्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शरीराला लगेच एनर्जी मिळते आणि दिवसभर टिकून राहते.
- कॅल्शियम: रसगुल्ले दुधापासून बनवले जातात त्यामुळे यात कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असते जे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते.
- हायड्रेशन: रसगुल्ले साखरेच्या पाकात बनवलेले असतात जातात,ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते.
जास्त प्रमाणात रसगुल्ला खाण्याचे दुष्परिणाम (side effects)
- कॅलरीज: रसगुल्ल्यामध्ये कॅलरीचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते म्हणून ते कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे.
- साखर: रसगुल्ल्यामध्ये साखरेचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी रसगुल्ले खाऊ नये.शिवाय जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे मधुमेह होऊ शकतो.
- फॅट : रसगुल्ले जास्त फॅट असलेल्या दुधापासून बनवले जातात त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्यास वजन आणि चरबी झपाटयाने वाढते.
- पचनाचा त्रास : रसगुल्ले पचायला जड असतात म्हणून ते जास्त प्रमाणात खाऊ नये नाहीतर पचायला त्रास होऊ शकतो.
Rasgulla Recipe बनवण्याचे विविध प्रकार (types of rasgulla)
- केसर रसगुल्ला: रसगुल्ला बनवताना तुम्ही त्यात केशर सुद्धा घालू शकता ज्यामुळे चवीला केशरचा फ्लेवर येतो आणि सोनेरी रंग येतो.
- चॉकलेट रसगुल्ला: रसगुल्ला बनवताना तुम्ही त्यात कोको पावडर किंवा चॉकलेट सिरपचा तुमच्या चवीनुसार वापर करू शकता ज्यामुळे मस्त चॉकलेटी टेस्ट येते.
- नारळ रसगुल्ला: रसगुल्ला बनवताना तुम्ही नारळाच्या दुधात शिजवून बनवू शकता.
- ड्राय फ्रूट रसगुल्ला: रसगुल्ला बनवताना तुम्ही त्यात काजू,बदाम, पिस्ता चे तुकडे टाकू शकता.त्यामुळे चव अजून वाढते.
- गुलाब रसगुल्ला: रसगुल्ला शिजवताना साखरेच्या पाण्यात तुम्ही गुलाबपाणी मिसळले तर त्याला मस्त गुलाबी फ्लेवर येतो.
रसगुल्ला सर्व्ह करण्यासाठी (recipe suggestions)
- थंडगार: रसगुल्ला खाण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा रसगुल्ल थंडगार सर्व्ह करतात.
- गार्निश: रसगुल्ला सर्व्ह करताना काजू,पिस्ता किंवा बदाम,कापुन गार्निश करा.
- रबडी सोबत: रसगुल्लाला रबडी सोबत सुद्धा सर्व्ह करु शकता.
- आइस्क्रीम सोबत: फ्यूजन डेझर्टसाठी व्हॅनिला आइस्क्रीम सोबत रसगुल्ला सर्व्ह करून बघा.
- फ्रूट सॅलड: ताज्या फळांच्या सॅलड सोबत सुद्धा रसगुल्ला सर्व्ह करु शकता.
रेसिपिसाठी किचनमध्ये लागणारे साहित्य (what are kitchen equipments)
- जाड भांडे: दूध उकळून पनीर तयार करण्यासाठी जाड भांडे वापरा.
- सुती कापड: पनीर गाळून घेण्यासाठी सुती कापडाचा वापर करा.
- पनीर मळून घेण्यासाठी मोठ्या आकाराचे बाउल वापरा.
- रसगुल्ला साखरेच्या पाकात शिजवताना रुंद आकाराचे भांडे वापरा.
- स्लॉटेड स्पून: रसगुल्ला साखरेच्या पाकातून प्लेटमध्ये काढण्यासाठी.
- कूलिंग रॅक: रसगुल्ले थंड करण्यासाठी.
- कप आणि चमचे मोजण्यासाठी: घटकांचे प्रमाण अचूक मोजण्यासाठी.
रसगुल्ल्यामध्ये मैदा असतो का?(Does Rasgulla contain flour?)
रसगुल्ल्यामध्ये मैद्याचा वापर करत नसतात.पण तुम्हाला मैदा घालायचा सेल तर तुम्ही मैदा घालू शकता.
1 किलो रसगुल्ल्यात किती रसगुल्ले असतात?( How many pieces are there in 1 kg Rasgulla? )
जर तुम्ही एमेझोन वरून रसगुल्ले मागवले तर त्यात १ किलो रसगुल्ल्याच्या डब्यात २० रसगुल्ले मिळतात.
एका दिवसात किती रसगुल्ले खाऊ शकतो ? (How much Rasgulla should one eat in a day?)
रसगुल्ल्यामध्ये जास्त साखर आणि जास्त कॅलरीज असतात त्यामुळे दिवसातुन दोन ते तीन रसगुल्ले खाऊ शकता.
1 लिटर दुधात किती रसगुल्ले बनवता येतात? (How many Rasgullas can be made in 1 liter milk?)
हे रसगुल्ल्याचे गोळे बनवण्यावर अवलंबून असते.छोटे गोळे बनवले तर किमान २० रसगुल्ले तयार होतात. मोठे गोळे बनवले तर किमान रसगुल्ले १० तयार होतात.
Rasgulla Nutrition
calories | 36 |
fat | 20 gm |
cholesterol | 6 mg |
sodium | 27 mg |
pottasium | 78 mg |
carbohydtares | 4 gm |
sugar | 3 gm |
protien | 2 gm |
vitamin A | 90 IU |
vitamin C | 0.8 mg |
calcium | 67 mg |
iron | 0.2 mg |